Cheater Rameshwar Maharaj
Saturday, December 18, 2010
Saturday, November 20, 2010
ओंबळी-तामसडेवाडीतील साठवण तलावाचे काम अण्णा हजारेंचेच नांव वापरून मंजूर करून घेतले?

ओंबळी-तामसडेवाडीतील साठवण तलावाचे काम अण्णा हजारेंचेच नांव वापरून मंजूर करून घेतले?
ओंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत तामसडेवाडीतील साठवण तलावाच्या बिलाची रक्कम मिळण्यासंदर्भात महाड तालुक्यातील करंजाडी येथील रामेश्वर महाराज यांनी येथील तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणास सुरूवात करून त्याच रात्री उपोषण सोडण्यापूर्वी त्यांच्याच नोटीशीतील अन्य असंख्य मागण्यांकडे का दूर्लक्ष केले, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र, थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणित'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन' नावाचा गैरवापर झाल्याचे दिसून आल्याने त्यांनी ओंबळीतील साठवण तलावाचे कामही अण्णा हजारे यांचेच नांव वापरून मंजूर करून घेतले असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रामेश्वर महाराजांनी आमरण उपोषण करण्यासाठी दिलेल्या नोटीशीमध्ये ओंबळी तामसडेवाडीतील साठवण तलावाव्यतिरिक्त, पोलादपूर पंचायत समितीमधील १६ लाख ८० हजाराच्या अपहारप्रकरणी आयोगामार्फत चौकशी करावी, पोलादपूर आरोग्य-अनेरेचम विभागात काम करणा-या कुलकर्णी मॅडम यांनी कम्प्युटर व औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला असून स्वत:ची गाडी वापरून खोटी बिले काढली आहेत, असा आरोप करून आयोगामार्फत चौकशी करावी, पोलादपूर पंचायत समितीमध्ये कागदपत्र एका टेबलावरून ६ महिने तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये १ महिना हालत नाही,अशी तक्रार करून महाड व पोलादपूर तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांचे २००९ च्या वादळांमध्ये नुकसान झाले असून आयोगाने या शाळांना निधी द्यावा, रायगड जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पी.ए. यांची बदली करण्यात यावी, पोलादपूर तालुक्यातील गजानन चिकणे याचे दारिद्य्ररेषेखालील कमी करण्यात आलेले नांव पुन्हा समाविष्ठ करून त्याला घरकूल देण्यात यावे, महाड व पोलादपूर तालुक्यातील रेशनदुकानदार केशरी कार्डधारकांना रेशन देत नाहीत व त्याची पावतीही देत नाहीत, याबाबत चौकशी करण्यात यावी, रायगड जिल्हा परिषद कार्यालयामधील दोन अधिकारी, दोन क्लार्क व नर्स यांची बदली करावी,अशा विविध मागण्या केल्या आहेत. ओंबळी तामसडेवाडीतील साठवण तलावाचे काम अपूर्ण असताना त्या कामाचे महागाईनुसार पुन्हा एस्टीमेट करून संपूर्ण बिल काढण्यासाठी आमरण उपोषणाचा हत्यार उपसणाऱ्या रामेश्वर महाराजांची ही मागणी फोल ठरून खोटेपणाही उघड झाला असताना अन्य मागण्यांबाबतही त्यांचा हेतू स्पष्ट होण्याची गरज आहे. रामेश्वर महाराज यांना ओंबळी ग्रामपंचायतीला मार्च २०१० मध्ये साठवण तलावाच्या कामाच्या खोदकामानंतर १ लाख ९७ हजार १५५ रूपयांचे बिल अदा करण्यात आले, ही बाब माहित असताना त्यांनी पुढील बिलाची तयार करून ठेवलेली रक्कम २ लाख ७८ हजार ३ रूपये मिळण्याचा पाठपुरावा करण्याऐवजी बिलाची अंतिम रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला असल्याने याबाबत संबंधित अधिकारीवर्गाची अनूकूलता तपासून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.आमरण नोटीशीमध्ये आणि उपोषणस्थळाच्या बॅनरवर रामेश्वर महाराज यांनी केलेला अण्णासाहेब हजारे प्रणित'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन' नावाचा गैरवापर पाहता ओंबळी-तामसडेवाडीतील कामही त्यांनी अण्णा हजारे यांचेच नांव वापरून मंजूर करून घेतले असावे, असा कयास जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते लावत असून याअनुषंगानेही चौकशी सुरू आहे.
रामेश्वर महाराजांनी, 'कशासाठी केला हा सारा अट्टाहास?' ओंबळी ग्रामस्थांना प्रश्न
पोलादपूर तालुक्यातील ५० वर्षांहून अधिक काळ तंटामुक्त असल्याने राज्यास आदर्श असलेल्या ओंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत तामसडेवाडीतील अपूर्ण साठवण तलावाच्या बिलाची रक्कम मिळण्यासंदर्भात महाड-करंजाडी येथील रामेश्वर महाराज यांनी येथील तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू केलेले आमरण उपोषण रात्री आठ वाजल्यानंतर बिनशर्त मागे घेतले. दरम्यान, पोलादपूरचे गटविकास अधिकारी महादेव आरगे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सदर काम अपूर्ण असल्याचे पत्र मोजमापाच्या उल्लेखासह दिले असल्याने स्वत: कामाच्या ठिकाणी जाऊन काम अपूर्णच असल्याची खात्री पटविली. त्यामुळे रामेश्वर महाराजांनी, 'कशासाठी केला हा सारा अट्टाहास?' ओंबळी ग्रामस्थांना प्रश्न पडलेला दिसत आहे.ओंबळी ग्रामपंचायतीला मार्च २०१० मध्ये साठवण तलावाच्या कामाच्या खोदकामानंतर १ लाख ९७ हजार १५५ रूपयांचे बिल अदा करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात होऊन काम अपूर्ण असतानाच ज्युनियर इंजिनियर बुटाला यांनी दिलेल्या सुचनावर अंमलबजावणी न करताच अंतिम बिलाची मागणी करण्यात आली. या कामाचे दुसऱ्या बिलाची रक्कम २ लाख ७८ हजार ३ रूपये तयार करून ठेवले असतानाही सदर काम पूर्ण केले गेले नाही आणि अंतिम बिलाची मागणी करण्यात आली. यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा खात्याने १५ सप्टेंबर २०१० च्या पत्राद्वारे याकामी तलावाचा मंजूर आकार १० मीटर रूंदी व १० मीटर लांबी असा असताना प्रत्यक्षात तेवढे काम झाले नाही तसेच या कामातील जमिनीपासून ३ फूटाचा धक्का आणि काँक्रीटीकरण केले नसल्याचे या खात्याचे ज्युनियर इंजिनियर बुटाला यांनी कळवून याकारणास्तव पुढील २.७८ लाख रूपये बिलाचा प्रस्ताव करता येत नसल्याचे नमूद केले. सद्यस्थितीत या तलावाची रूंदी ८ मीटर व लांबी ८.५३ मीटर एवढीच असून ती मंजूर आकाराएवढी वाढविता येणार नसल्याने हे काम पूर्णत्वास जाणे अशक्य आहे. मात्र, साठवण तलावाची उंची जमिनीच्या लेव्हलपेक्षा ३ फूट वाढविणे आणि त्यावर काँक्रीटचे उभे राहण्यासाठी बांधकाम करणे शक्य आहे. मात्र, आता उपोषणानंतर पुढील बिलाची रक्कम २ लाख ७८ हजार ३ रूपये तयार करून ठेवल्यानुसार रामेश्वर महाराजांच्या उपोषणानंतर देण्याची अनाकलनीय मानसिकता अधिकारी वर्गात दिसून येत आहे.रामेश्वर महाराजांनी उपोषण करण्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये ओंबळी तामसडेवाडीतील साठवण तलावाव्यतिरिक्त, पोलादपूर पंचायत समितीमधील १६ लाख ८० हजाराच्या अपहारप्रकरणी आयोगामार्फत चौकशी करावी, पोलादपूर आरोग्य-अनेरेचम विभागात काम करणाऱ्या कुलकर्णी मॅडम यांनी कम्प्युटर व औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला असून स्वत:ची गाडी वापरून खोटी बिले काढली आहेत, असा आरोप करून आयोगामार्फत चौकशी करावी, पोलादपूर पंचायत समितीमध्ये कागदपत्र एका टेबलावरून ६ महिने तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये १ महिना हालत नाही,अशी तक्रार करून महाड व पोलादपूर तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांचे २००९ च्या वादळांमध्ये नुकसान झाले असून आयोगाने या शाळांना निधी द्यावा, रायगड जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पी.ए. यांची बदली करण्यात यावी, पोलादपूर तालुक्यातील गजानन चिकणे याचे दारिद्य्ररेषेखालील कमी करण्यात आलेले नांव पुन्हा समाविष्ठ करून त्याला घरकूल देण्यात यावे, महाड व पोलादपूर तालुक्यातील रेशनदुकानदार केशरी कार्डधारकांना रेशन देत नाहीत व त्याची पावतीही देत नाहीत, याबाबत चौकशी करण्यात यावी, रायगड जिल्हा परिषद कार्यालयामधील दोन अधिकारी, दोन क्लार्क व नर्स यांची बदली करावी,अशा विविध मागण्या केल्या आहेत. रामेश्वर महाराज यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या नोटीशीमध्ये 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन' असा उल्लेख असल्याने त्यांच्या अण्णासाहेब हजारे यांच्यासोबतच्या संबंधाबाबत साशंकता निर्माण होऊन यासंदर्भात अण्णांचे निकटवर्ती सहकारी अल्लाऊद्दीन शेख यांनी ते आंदोलनाशी साधे सदस्य म्हणूनही संबंधित नसल्याचे स्पष्टीकरण दिले. अधिक माहिती मिळविता ओंबळी ग्रामपंचायतीवर असलेल्या साठवण तलावाच्या कामाचे पोटठेकेदार तेथील रामेश्वर महाराजांचे समर्थक असून या पोटठेकेदारानेही हे काम रोहे येथील अन्य ठेकेदाराकडून करून घेतले असल्याने रामेश्वर महाराजांचा या अपूर्ण असलेल्या कामाच्या बिलाची रक्कम महागाई विचारात घेऊन नवीन एस्टीमेट बनवून मिळण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा काय हेतू असावा?तसेच आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बदल्या आणि रेशन दुकानदार, प्राथमिक शाळांना निधी तसेच दारिद्रयरेषेखालील यादी अन् घरकूल याबाबतच्या आयोगाच्या उल्लेखासह केलेल्या मागण्यांमुळे रामेश्वर महाराजांनी 'कशासाठी केला हा सारा अट्टाहास?' असे कुतूहल वाढत आहे. अण्णासाहेब हजारे प्रणित 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन'खोटया उल्लेखाद्वारे रामेश्वर महाराजांनी असत्यावर आधारित उपोषण केल्याने हे दबावतंत्र अथवा सरकारी कामात व्यत्यय आणणे आहे का, याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लवकरच भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहेत.
तलावाच्या कामाच्या बिलासाठी 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलना'चा गैरवापर!
पोलादपूर तालुक्यातील ५० वर्षांहून अधिक काळ तंटामुक्त असल्याने राज्यास आदर्श असलेल्या ओंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत तामसडेवाडीतील साठवण तलावाच्या बिलाची रक्कम मिळण्यासंदर्भात महाड तालुक्यातील करंजाडी येथील रामेश्वर महाराज यांनी येथील तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी उपोषणास सुरूवात केली. मात्र, यावेळी थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणित'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन' नावाचा उपोषणकर्त्यांकडून सर्रास गैरवापर होत असल्याचे येथील आंदोलनाचे कार्यकर्त्याने उघडकीस आणले.
तरीही लोकशाही देशात सत्याग्रहाचा अधिकार प्रत्येक नागरिकांस असल्याने त्यांचे उपोषण पार्श्वभागी लावलेला बॅनर काढून सुरूच राहिल्याने सत्याग्रह असत्यासाठीही करण्यास सरकारी मानसिकता अनूकूल असल्याचे दिसून आले.पोलादपूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून ओंबळी तामसडेवाडीतील साठवण तलावासंदर्भात रामेश्वर महाराजांचे नांव वृत्तपत्रांतील बातम्यांद्वारे चर्चेत आहे. ५० वर्षांहून अधिक काळ तंटामुक्त असल्याने राज्यास आदर्श असलेल्या ओंबळी ग्रामपंचायतीअंतर्गत तामसडेवाडीत कशाबद्दल नाराजी आहे. हे समजून येत नसल्याने हा प्रकार सुरूच राहिला.अचानक पोलादपूर तहसिल कार्यालयाला रायगडचे निवासी जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार रामेश्वर महाराज मंगळवारी तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे पत्र प्राप्त झाले आणि सदर उपोषण टाळण्यासाठी सरकारी प्रयत्नांचा भाग म्हणून पोलादपूरचे तहसिलदार गणेश सांगळे यांनी रामेश्वर महाराजांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चेस बोलाविले असता त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी सकाळी रामेश्वर महाराज उपोषणास बसल्यानंतर तहसिलदार सांगळे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव आरगे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे डेप्युटी इंजिनियर डी.एम.खैरे आणि ज्युनियर इंजिनियर शैलेश बुटाला यांना उपोषणकर्त्यांसोबत चर्चेसाठी पाचारण केले.चर्चेदरम्यान, तेथे आलेले पत्रकार शैलेश पालकर यांना उपोषणकर्त्यांनी समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणित 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन' नाव आणि रामेश्वर महाराजांचे छायाचित्रही बॅनरवर असल्याने रामेश्वर महाराजांच्या हेतूबाबत साशंकता निर्माण झाली. याबाबत त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी रामेश्वर महाराज हे अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते नसल्याचे यावेळी पत्रकार व आंदोलनाचे तालुका प्रतिनिधी शैलेश पालकर सांगून या प्रकाराबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, यावेळी रामेश्वर महाराजांनी तात्काळ बॅनर काढून टाकला. परंतू, त्यांनी दिलेल्या उपोषणाच्या नोटीशीमध्ये 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन' असा उल्लेख असल्याने पत्रकार पालकर यांनी याबाबत पोलादपूर तहसिलदार सांगळे यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्यांनी पालकर यांना लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला सत्याग्रहाचा सनदशीर हक्क असल्याचे सांगून या उपोषणकर्त्यांचे त्यांनी केलेल्या असत्य कृतीकडे दूर्लक्ष करीत त्यांचे मनोधैर्य वाढविले. त्यामुळे रामेश्वर महाराजांचे उपोषण पुन्हा सुरू झाले.दुरूस्ती कामांतर्गत टंचाईग्रस्त ओंबळी तामसडेवाडी येथील साठवण तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना सदर कामाच्या पूर्ततेची कागदपत्रेही तेथील सरपंच व ग्रामसेवकाने पाठविली नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा खात्याने १५ सप्टेंबर २०१० च्या पत्रावरून दिसून येत आहे. याकामी तलावाचा मंजूर आकार १० मीटर रूंदी व १० मीटर लांबी असा असताना प्रत्यक्षात तेवढे काम झाले नाही तसेच या कामातील जमिनीपासून ३ फूटाचा धक्का आणि काँक्रीटीकरण केले नसल्याचे या पत्राद्वारे या खात्याचे ज्युनियर इंजिनियर बुटाला यांनी कळवून याकारणास्तव पुढील २.७८ लाख रूपये बिलाचा प्रस्ताव करता येत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, सर्व वस्तुस्थिती आजही कायम असताना रामेश्वर महाराज यांच्याकडून केला जात असलेला सत्याग्रह हा काम अपूर्ण ठेऊन केवळ बिलाची रक्कम काढण्यासाठी दबावतंत्राचा भाग असल्याचे उघड होत आहे. रामेश्वर महाराजांनी सरपंच ओंबळी यांच्या नावाने बिलाची रक्कम दिली जाणार असताना कोणत्या हेतूने उपोषण केले, याबाबत चौकशी करण्याची गरज असून सरकारी कामात दबाव निर्माण केल्याप्रकरणी सरकारी अधिकारीही कोणती भूमिका घेणार? याबाबत आता भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)